IPL 2020, KXIP vs MI: मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय

ipl-2020-mumbai-indians-beats-kings-xi-punjab-by-48-runs
ipl-2020-mumbai-indians-beats-kings-xi-punjab-by-48-runs

Indian Premier League 2020, KXIP vs MI : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात सामना झाला. पंजाबविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने ४८ धावांनी सहज विजय मिळवला.

रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईच्या संघाने १९१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावाच करू शकला. राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकूटाने प्रत्येकी २-२ बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला. धडाकेबाज खेळी करणाऱ्या कायरन पोलार्डला सामनावीर घोषित करण्यात आले.

किंग्ज इलेव्हन पंजाबकडून निकोलस पूरन याने सर्वाधिक म्हणजेच 44 रन्स केल्या. मयांक अग्रवालने 25 रन्स, कृष्णप्पा गौतमने 22 रन्स, केएल राहुलने 17 रन्स केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 143 रन्सपर्यंत मजल मारता आली आणि मुंबईने ही मॅच 48 रन्सने जिंकली.

मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सने केलेल्या बॉलिंगपुढे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमचे बॅट्समन चांगली कामगिरी करु शकले नाहीत. मुंबई इंडियन्सकडून जेम्स पॅटिन्सन, जसप्रित बुमराह, राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई अव्वल

मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 4 मॅचेसपैकी 2 मॅचेस जिंकल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या नावावर 4 पॉईंट्स असून रनरेट सर्वाधिक असल्याने पहिल्या क्रमांकावर मुंबई पोहोचली आहे.

मॅचच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमची सुरुवात खराब झाली. ओपनर बॅट्समन क्विटन डिकॉक इनिंगच्या पाचव्याच बॉलवर आऊट झाला. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावत 191 रन्स करत पंजाबसमोर विजयासाठी 192 रन्सचे आव्हान ठेवले.

वाचा : राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशच्या घटनेवरून योगी सरकारला सुनावले

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा याने पंजाब विरुद्ध आपली इनिंग सुरु करुन फोर लगावताच आयपीएलमध्ये पाच हजार रन्सचा टप्पा गाठला. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या नंतर पाच हजार रन्सचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा तिसरा प्लेअर ठरला आहे.

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 45 बॉल्समध्ये 70 रन्सची इनिंग खेळली. किरेन पोलार्डने 47 रन्स, हार्दिक पांड्याने 30 रन्स, इशान किशनने 28 रन्सची इनिंग खेळली. तर पंजाब कडून शेल्डन, मोहम्मद शमी, कृष्णप्पा गौतम या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here