Corona updates : दिवसभरात कोरोनाबाधित २५७ जणांचा मृत्यू,१७ हजार नवे रुग्ण

१५ हजार ७८९ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला

maharashtra-Corona-Update-9812-new-corona-patients-registered-in-the-state-156-patients-died-news-update
maharashtra-Corona-Update-9812-new-corona-patients-registered-in-the-state-156-patients-died-news-update

मुंबई : कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. आज राज्यात १७ हजार ६६ नवे करोनाबाधित आढळले असून, २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. १५ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार २५६ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आतापर्यंत ७ लाख ५५ हजार ८५० रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात १० लाख ७७ हजार ३७४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ लाख ९१ हजार २५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ५३ लाख २१ हजार ११६ नमून्यांपैकी १० लाख ७७ हजार ३७४ नमूने (२०.२ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात १७ लाख १२ हजार १६० जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार १९८ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत आज २ हजार २५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

मुंबईत आज २ हजार २५६ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ३१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ७१ हजार ९४९ वर पोहचली असून, यामध्ये ३१ हजार ६३ अॅक्टिव्ह रुग्ण, कोरोनामुक्त झालेले १ लाख ३२ हजार ३४९ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८ हजार १७८ जणांच्या संख्येचा समावेश आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here