free COVID Vaccinations l 18 वर्षांवरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या महत्वाची माहिती!

mumbai-no-covid-19-vaccination-on-saturday-and-sunday-too-due-to-dose-shortage-news-update
mumbai-no-covid-19-vaccination-on-saturday-and-sunday-too-due-to-dose-shortage-news-update

नवी दिल्ली : आजपासून देशात 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे मोफत लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी Co-Win अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य असणार नाही. ज्यामुळे दररोज होणाऱ्या लसीकरणाच्या तुलनेत आता लसीकरणात वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या संपूर्ण लसीकरणाबद्दलची माहिती.Covid-19-vaccine-free-for-all-from-today-21-june-all-you-need-to-know-news-update

खासगी रुग्णालयात किंमत निश्चित
आजपासून या टप्प्यात दररोज 50 लाख लोकांना लस देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत, दररोज 40 लाखांपेक्षा कमी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयांकरिता 25 टक्के लसींची खरेदीची खात्री केली आहे. त्यानुसार सरकारने खासगी क्षेत्राला या टप्प्याचा भाग बनवण्यास पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या या निर्णयामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयात कोरोना लसीसाठी जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. कारण या लसीची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयातही लस घेता येणार
आज 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

जर तुम्ही सरकारी रुग्णालयात लस घेत असाल तर…
>>लसीकरण विनामूल्य असेल.
>>Co-Win अॅपवर पूर्व-नोंदणी करणे अनिवार्य नाही. कारण सरकार आजपासून स्पॉट नोंदणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
>>जर खाजगी रुग्णालयात जात असाल तर…
>>Co-Win अॅपवर नोंदणीची आवश्यकता नाही
>>कोवॅक्सिन लसीसाठी ₹1,410, कोविशील्ड लसीसाठी ₹790 आणि स्पुतनिक V या लसीसाठी ₹1,145 ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त पैसे देऊ नका.
>>कारण केंद्राने खासगी रुग्णालयांमध्ये या लसींची कमाल किंमत निश्चित केली आहे.

लसीकरणाचे प्रमाणपत्र खरे की खोटे? कसे ओळखाल
गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीच्या घोटाळ्याची अनेक प्रकरण चर्चेत आली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचे योग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच यासाठी योग्य लस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
>verify.cowin.gov.in या लिंकवर क्लिक करा. यात तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय असेल.
>त्या बटणावर क्लिक करा.
>त्यानंतर मोबाईलमधील कॅमेऱ्याच्या मदतीने लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करा.
>यानंतर पडताळणी केल्यावर तुम्हाला नाव, वय, लिंग, प्रमाणपत्र आयडी, ते जारी केल्याची तारीख, लसीकरणाच्या सुविधा इत्यादी सर्व गोष्टी दर्शवतील.
>जर तुमचे प्रमाणपत्र खोटे असेल तर तो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुमचे प्रमाणपत्र अमान्य असल्याचे सांगेल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here