Congress Election : काँग्रेस कार्यकारिणीच्या पदांसाठी आता निवडणुका होणार!

elections-announced-for-first-time-in-45-years-for-congress-executive-committee-news-update-today
elections-announced-for-first-time-in-45-years-for-congress-executive-committee-news-update-today

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मात्र त्यापाठोपाठ काँग्रेसने (Congress) राष्ट्रीय कार्यकारणीसाठीही निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री (Madhusudan Mistry) यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या ४५ वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारणीची निवडणूक होणार आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत २३ सदस्य असून त्यापैकी १२ जणांची निवड निवडणुकीद्वारे घेण्यात येते, तर ११ जणांची निवड नामनिर्देशित पद्धतीने होते. जर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी १२ पेक्षा जास्त अर्ज आले, तर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी निवडणुका घेण्यात घेईल, अशी माहिती मधुसूदन मिस्री यांनी दिली आहे. तसेच यासाठी काँग्रेसचे राज्य निवडणूक अधिकारी सर्व राज्यांना भेट देणार असून सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: SCO Summit 2022: भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवायचंय- PM मोदी

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीयकार्यकारणीसाठी ४५ वर्षांनंतर पहिल्यांच निवडणुका होणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारणीसाठी शेवटची निवडणूक १९९७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारणी घोषीत करत होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here