मुंबई : दीपिका पदुकोणला ड्रग प्रकरणात शनिवारी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे (Deepika Padukone)ची डिलीट केलेली 2017 ची जुनी चॅट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB )च्या हाती लागली. व्हॉट्सअॅपमध्ये चॅटसाठी एन्ड टू एन्ड इंक्रिप्शनसारखी प्रायव्हसी सेटिंग असतानाही दीपिकाची चॅट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) ला कशी मिळाली? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर व्हॉट्सअॅपकडूनच खुलासा आला आहे (Deepika Padukone WhatsApp Chat leak and WhatsApp explaination).
ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह (Rhea Chakraborty) अनेक लोकांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB ) ने अटक केली आहे. त्यानंतरच्या चौकशीत अनेक मोठी नावंही समोर आली आहेत. त्यातच एक जुनी व्हॉट्सअॅप चॅट देखील एनसीबीच्या हाती लागली. त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सची अडचण वाढली आहे. यात बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणसह (Deepika Padukone) अनेक अभिनेत्रींची नाव आली आहेत. या प्रकरणी एनसीबीने दीपिकाला चौकशीसाठी समन्सही पाठवले आहे.
व्हॉट्सअॅपने दावा केला आहे की त्यांची सर्व चॅट एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन (End to end Encrypted) असते. म्हणजेच ही चॅट केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवली त्यालाच वाचता येते. अगदी व्हॉट्सअॅप देखील ही चॅट वाचू शकत नाही. कारण ही चॅट कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह होत नाही. ती केवळ संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असते. तेथून डिलीट केल्यावर ती कोठेच राहत नाही. मात्र, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि आताच्या ड्रग्ज प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्याची चर्चा सुरु झाल्याने व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसीच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप यावर खुलासा केला आहे.
व्हॉट्सअॅपचा खुलासा, जाणून घ्या चॅट लीक कशी होते?
व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्याच्या या चर्चेनंतर तयार झालेल्या संशयास्पद वातावरणात व्हॉट्सअॅपने लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी चॅट लीक कसे होते याविषयीचा अधिकृत खुलासा केला आहे. व्हॉट्सअॅपने म्हटलंय, “‘एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन’ व्हॉट्सअॅपच्या सर्व चॅटला सुरक्षित करते. सेंडर आणि रिसिव्हरशिवाय इतर कुणालाही ही चॅट वाचता येत नाही. कारण व्हॉट्सअॅपवर फोन नंबरचा उपयोग करुन लॉग इन केलं जातं. त्यामुळे स्वतः व्हॉट्सअॅपला देखील हे मेसेज वाचता येत नाही.
पाहा : दीपिका पदुकोण ड्रग प्रकरण काय आहे वाचा सविस्तर क्लिक करा
व्हॉट्सअॅपकडून Operating System Manufacturers च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जातं. त्यामुळे चॅट केवळ फोनवरच सेव्ह होते. चॅट लीक होऊ नये म्हणून व्हॉट्सअॅपने पॉसवर्ड आणि बॉयमेट्रिक ID च्या उपयोगाचा सल्ला दिला आहे. जेणेकरुन फोनवरील चॅट दुसरा कोणताही व्यक्ती वाचू शकणार नाही.
दीपिका पदुकोणची चॅट लीक कशी झाली? असा प्रकार घडण्याची शक्यता
सुशांत सिंह राजपूतची टेलेंट मॅनेजर जया साहासोबत दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माने चॅट केली होती. हीच चॅट NCB च्या हाती लागली. जयाने आपल्या व्हॉट्सअॅप चॅटचा गुगल ड्राईव्हवर (Google Drive) किंवा Apple च्या iCloud वर बॅकअप घेतला होता, असं सांगितलं जात आहे. कोणताही बॅकअप प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपच्या एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन पॉलिसीत येत नाही. अशावेळी तपास संस्था संशयितांचा फोन डाटा दुसऱ्या एखाद्या डिव्हाईसवर कॉपी करतात. त्यासाठी फोन क्लोनिंग तंत्राचा उपयोग होतो. यामुळे बॅकअप चॅट सहजपणे वाचता येते. दीपिकाच्या चॅटविषयी देखील असंच झाल्याचं चर्चा आहे.






































































































































