‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ

faug-fearless-and-united-guard-launched-akshay-kumar-share-video-of-it-on-social-media
faug-fearless-and-united-guard-launched-akshay-kumar-share-video-of-it-on-social-media

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार Akshay kumar अँक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. अक्षय सोशल मीडियावर Social media प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अक्षयने PUBG या गेम सारखा FAU-G Fearless and United Guards हा भारतीय गेम लॉंच केला आहे. हा मेड इन इंडिया मल्टी- प्लेयर मोबाइल गेम आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात लॉंच करण्यात आला आहे.

अक्षयने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अक्षयने इन्स्टाग्रामवर या गेमचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. “FAU-G Fearless and United Guards. शत्रुचा सामना करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आपल्या देशासाठी लढा. आपल्या ध्वजाचे संरक्षण करा. Fearless and United Guards – FAU-G हा गेम आपल्याला फ्रंटलाइन आणि त्यापलीकडे नेईल! तुमच्या मिशनची सुरूवात आज करा.” अशा आशयाच कॅप्शन अक्षयने त्या गेमचा व्हिडीओ शेअर करत दिलं आहे. या व्हिडीओला १ तासाच्या आत ८ लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा: दिल्ली हिंसाचारानंतर शरद पवारांचे मोदी सरकारला ‘हे’आवाहन!

हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि अक्षयने डेव्हलप केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा एकदा PUBG Mobile India आल्या नंतर आता त्या गेमसोबत FAU-G ची कडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here