Sambhaji Bhide : भिडेंना गांधीव्देष भोवला, अमरावतीत गुन्हा दाखल; देशभर आंदोलन सुरु

uddhav-thackeray-faction-shivsena-attacks-sambhaji-bhide-and-devendra-fadnavis-in-saamana-editorial-news-update-today
uddhav-thackeray-faction-shivsena-attacks-sambhaji-bhide-and-devendra-fadnavis-in-saamana-editorial-news-update-today

अमरावती: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी Manohar Bhide उर्फ संभाजी भिडे पुन्हा अडचणीत सापडले आहे. राष्ट्रतपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात भिडेंनी अमरावतीच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले. याविरोधात सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. भिडेंच्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्याविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी भिडे, निशांदसिंह जोध, अविनाश जोध व कार्यक्रमाच्या आठ इतर आयोजकांच्या विरोधात पोलिसांनी भादंवी १५३ (३), ५००, ५०५(२), ३४ कलमान्वनये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. महापुरूषांविषयी वादग्रस्त‍ विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविणे, विविध समाज घटकांमध्ये वाद वाढविणारे भाष्यि करणे आणि महापुरूषांची बदनामी करणे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: “संभाजी भिडे फक्त सोंगाड्या, हे सगळं टूलकिट…”, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा गंभीर आरोप!

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे सध्या वाद पेटला. संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर समविचारी पक्ष,संघटनांकडून आंदोलन केले जात आहे. राष्ट्रपित्याबाबत वाईट भाष्य करणे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने बंदोबस्त करून त्यांना अटक करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल विधानसभेत केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here