IPL 2020, KKR vs CSK: कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नईवर १० धावांनी मात

ipl-2020-kkr-vs-csk-match-21-kolkata-knight-riders-won-by-10-runs
IPL 2020, KKR vs CSK: कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नईवर १० धावांनी मात ipl-2020-kkr-vs-csk-match-21-kolkata-knight-riders-won-by-10-runs

Indian Premier League 2020, KKR vs CSK: आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 21वी मॅच अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम (Zayed Cricket Stadium, Abu Dhabi)वर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या टीम्समध्ये झाली. ह सामना कोलकाताने 10 धावांनी जिंकला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या टीमला पहिला धक्का फाफ डु प्लेसिस याच्या आऊट होण्याने बसला. फाफ डु प्लेसिस हा 10 बॉल्समध्ये 17 रन्स करुन माघारी परतला. यानंतर शेन वॉट्सन आणि अंबाती रायडू यांनी टीमला सावरलं. शेन वॉट्सन याने 40 बॉल्समध्ये 50 रन्स केल्या. अंबाती रायडू याने 27 बॉल्समध्ये 30 रन्स केल्या तर महेंद्रसिंग धोनी 12 बॉल्समध्ये 11 रन्स करुन माघारी परतला.

चेन्नई सुपर किंग्सच्या टीमला पराभूत करत कोलकाता नाईट रायडर्सने ही मॅच जिंकली आहे. यामुळे आता कोलकातना नाईट रायडर्सची टीम आयपीएल 2020च्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने आतापर्यंत एकूण पाच मॅचेस खेळल्या असून त्यापैकी तीनमध्ये विजय मिळवत आपल्या खात्यात सहा पॉईंट्स जमा केले आहेत.

मॅचच्या सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने टॉज सिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 167 रन्स केल्या आणि चेन्नईला विजयासाठी 168 रन्सचं आव्हान दिलं. कोलकाताच्या टीमकडून राहुल त्रिपाठी वगळता एकाही बॅट्समनला चांगला स्कोअर करता आला नाही. राहुल त्रिपाठी याने 51 बॉल्समध्ये 81 रन्स

 केल्या. यामध्ये आठ फोर आणि तीन सिक्सचा समावेश आहे. सुनील नरिने याने 17 रन्स, पॅट कमिन्स याने नॉट आऊट 17 रन्स, दिनेश कार्तिकने 12 रन्स, शुभमन गिल याने 11 रन्स, नितीश राणाने 9 रन्स, ईऑन मॉर्गन याने 7 रन्स केल्या.

चेन्नईच्या टीमकडून ड्वेन ब्राव्हो याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. ब्राव्हो याने चार ओव्हर्समध्ये 37 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि करन शर्मा या तिघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here