महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट, दिवसभरात १६ हजार ६२० रुग्ण सापडले

india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update
india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update

मुंबई: राज्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर सुरूच आहे. आज (रविवार) दिवसभरात राज्यभरात १६ हजार ६२० कोरोनाबाधित वाढले. Maharashtra-reports-16620-new-covid-19-cases असुन, ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद 50-deaths झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२८ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

दरम्यान, आज ८ हजार ८६१ रुग्ण कोरोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१,३४,०७२  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.२१ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,१४,४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२६,२३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here