Bihar Assembly election : नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढणार- भाजप

Bihar election under-the-leadership-of-nitish-kumar-ji-bjp-jp-nadda
Bihar election under-the-leadership-of-nitish-kumar-ji-bjp-jp-nadda

दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपा व मित्रपक्षांनी सुरु केली आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल (जदयू) व लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. (Bihar election under-the-leadership-of-nitish-kumar-ji-bjp-jp-nadda)

 भाजपा प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठकही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची अध्यक्षतेखाली पार पडली. बैठीकत नड्डा यांनी सांगितले की, भाजपा, जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा आपलाच विजय झाला आहे. आपण तिन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढवणार व विजयी होणार आहोत.

भाजपाबरोबरच एनडीएतील सहकारी पक्ष असलेले जदयू आणि लोक जनशक्ती पार्टीचा देखील निवडणुकीत विजयी होतील. तसेच, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here