राहुल गांधी प्रकरणी बराक ओबामांवर शिवसेनेचा हल्लाबोल

भारतीय नेत्यांबाबत बोलणं चुकीचं

bharat-jodo-yatra-congress-mp-rahul-gandhi-called-shivsena-mp-sanjay-raut-tweet-news-update-today
bharat-jodo-yatra-congress-mp-rahul-gandhi-called-shivsena-mp-sanjay-raut-tweet-news-update-today

मुंबई l अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा Barack Obama यांचे ‘अ प्रॉमिस लँड’ A Promised Land हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. बराक ओबामा Barack Obama यांनी पुस्तकामध्ये काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी Rahul Gandhi यांच्याबद्दल टिपण्णी केली. त्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी बराक ओबामांवर हल्लाबोल केला.

शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बराम ओबामा Barack Obama यांना अशाप्रकारे भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांनी भारतीय नेत्यांबाबत बोलणं चुकीचं आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी Rahul Gandhi हे खूप चांगले काम करत असल्याचा दावा केला.

बराक ओबामा Barack Obama यांनी त्यांच्याविषयी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. ओबामांनी एक वक्तव्य केलं अन् इथल्या नेत्यांनी त्याचं राजकारण केलं, ही गोष्ट चुकीची आहे. उद्या ओबामा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलले तरीही माझी भूमिका हीच असेल, असे संजय राऊत Rahul Gandhi यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा l रुग्णवाहिकेला भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

बराक ओबामा Barack Obama यांनी केलेल्या टिप्पणीनंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधी Rahul Gandhi यांना ट्रोल केले होते. राहुल गांधी यांना देशातील बदनामी कमी पडत होती की काय म्हणून आता ते परदेशातही स्वत:ची बदनामी करून घेत असल्याची खोचक टीका भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी केली होती.

काय म्हणाले होते बराक ओबामा Barack Obama?

बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये या पुस्तकाचे परीक्षण छापून आले होते. या परीक्षणात ओबामा यांच्या पुस्तकातील अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख आहे. ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भेट घेतलेल्या जागतिक नेत्यांविषयीचे अनुभव कथन केले आहेत.

हेही वाचा l Cucumber Benefits l काकडीबरोबरच बिया खाण्याचे ११ गुणकारी फायदे

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.