सरकारच्या आशिर्वादाशिवाय अहमदाबादच्या जेलमधून बिश्नोई गँग चालवू शकत नाही; पोकळ घोषणा नको, हिम्मत असेल तर बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईत आणा : हर्षवर्धन सपकाळ

The Bishnoi gang cannot operate from an Ahmedabad jail without the government's blessings; enough with the hollow announcements—if you have the courage, apprehend Bishnoi and bring him to Mumbai: Harshvardhan Sapkal
The Bishnoi gang cannot operate from an Ahmedabad jail without the government's blessings; enough with the hollow announcements—if you have the courage, apprehend Bishnoi and bring him to Mumbai: Harshvardhan Sapkal

मुंबई:चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळ्या झाडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पोरखेळ पुन्हा उघड झाला आहे. मुंबई शहरात खुलेआम एका अभिनेत्यावर गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय झोपा काढते काय? लॉरेन्स बिश्नोई गँगने हा हल्ल्याचे सांगितले जात आहे पण हा गँगस्टर गुजरातच्या जेलमध्ये बंद आहे, तेथून तो कारवाया करत असेल तर सरकारच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोकळ घोषणाबाजी करण्यापेक्षा बिश्नोईच्या मुसक्या आवळून त्याला मुंबईत आणून त्याची चौकशी करून खटला दाखल करण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबई पोलिसांचा दरारा व नावलौकिक आता इतिहासजमा झाला आहे. पोलिसांची दंडुकेशाही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर, विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यापर्यंतच मर्यादीत आहे, गुन्हेगारांवर त्यांचा वचक राहिलेला नाही. मुंबईच नाही तर पुणे, ठाणे, नागपूरातही खुलेआम गुन्हेगारी होत आहे, पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीही करू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ते सर्वात निष्क्रीय गृहमंत्री आहेत. माजी मंत्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यात आला, चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरावर हल्ला करण्यात आला, या सर्व घटनांमध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचे सांगितले गेले मग आतापर्यंत या माफियाची चौकशी का केली नाही. महाराष्ट्र पोलिसांचे हात कोणी बांधले आहेत?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहविभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये  जारी केलेल्या एका आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम २६८ चा वापर करून लॉरेन्स बिश्नोईला सुरक्षा कवच दिले आहे. या कलमानुसार कोणत्याही राज्यातील पोलीस लॉरेन्स बिश्नोईला चौकशीसाठी गुजरात बाहेर घेऊन जाऊ शकत नाहीत. हा आदेश दरवर्षी एका वर्षाच्या कालावधीसाठी नूतनीकरण केला जातो. त्यामुळे बिष्णोईला संरक्षण मिळाले असून. तो जेलमध्ये बसून लोकांच्या हत्या करत आहे. केंद्र सरकारने त्याला दिलेले हे कायदेशीर संरक्षण मागे घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र सरकारने करावी. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात बिश्नोईच्या आकावर कारवाई करू, पण अशा पोकळ धमक्या जनतेने याआधी अनेकदा ऐकल्या आहेत. अहमदाबादच्या जेलमधून बिश्नोई गँग चालवतो व त्याच्यावर कारवाई होत नाही हे काय आहे? आसामचे पोलीस दिल्लीत जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक करतात, आसामचे पोलीस गुजरातमध्ये जाऊन विरोधी पक्षाच्या आमदाराला अटक करू शकतात. बिहारमध्ये झिरो FIR दाखल करून मुंबईतील घटनेची CBI चौकशी केली जाते मग अहमदाबादच्या जेलमध्ये असलेल्या बिश्नोईची चौकशी का होत नाही? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या अब्रुची लक्तरे फडणवीस सरकारने कधीच वेशीवर टांगलेली आहेत. दुसऱ्यांचे दोष दाखवण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा कारभार पहावा व नंतर बोलावे.           

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना फक्त ‘वसुली’ करणे व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचे काम सोपवलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला नाही म्हणून आता त्यांच्यामागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला आहे. गँगस्टर, आका, खोके, ड्रग्ज माफिया, वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्याची महायुती सरकारमध्ये धमक नाही, त्यांनी खुर्ची सोडावी, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई में लगातार हमले करने वाले गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई से आज तक पूछताछ क्यों नहीं? बिश्नोई भाजपा का कौन लगता है?: हर्षवर्धन सपकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here