NCP: राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे राजेश टोपे, आ. सतीश चव्हाणसह प्रदेश पदाधिका-यांची पाठ!

liaison-minister-rajesh-tope-to-the-movement-of-ncp-state-officials-including-satish-chavan-absent
liaison-minister-rajesh-tope-to-the-movement-of-ncp-state-officials-including-satish-chavan-absent

औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून  छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, रामदेव बाबांकडून महिलांबाबत केलेले विधान, शेतक-यांचे प्रश्न, महागाई भ्रष्टाचारविरोधात आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालायसमोर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाकडे संपर्क मंत्री राजेश टोपे, आ.सतीष चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, उपाध्यक्ष इलियास किरमाणी, राज्य सदस्य कमाल फारुकी, संघटक शेख मसूद यांच्यासह इतर शेकडो पदाधिका-यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे राष्ट्रवादीत गटबाजी असल्याचे आंदोलनावरून दिसून आले.

केंद्रातील भाजप सरकार, तसेच राज्यातील शिंदे-फडणीस सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज, फुले दांम्पत्य, महिलांचा अपमान केला जात आहे. सत्तेतील तसेच त्यांच्या जवळच्या लोकांकडून राष्ट्रपुरुषांचा अवमान होत आहे. मात्र सत्तेतील भाजप गप्प आहे. शेतक-यांवरील अन्याय, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र महत्वाचे पदाधिकारी आंदोलनात आले नाही.

आजच्या जनआक्रोश आंदोलनामध्ये शहराध्यक्ष ख्वॉजा शरफोद्दीन, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, प्रदेश सचिव शेख मुश्ताक, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील, शहराध्यक्षा मेहराज पटेल, अंकिता विधाते, किशोर पाटील, युवक काँग्रेस डॉ.मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष शेख कय्यूम, मंजुषा पवार, शकीला खान, शमा परवेज, कविता होळकर, मालती निकम, प्रतिभा वैद्य, सुभद्रा जाधव, अनिसा बाजी, सलमा बेगम, शेख इरफान, इम्रानउल हक, रजी राजा, शेख सलिम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकार बदलण्याची वेळ: केंद्र, राज्य सरकार हुकूमशाही पध्दतीने वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज,फुले दांमप्त्यांचा अवमान करणा-या राज्यपालांना भाजप पाठिशी घालत आहे. शेतकरी त्रस्त आहे. शेतकरी त्रस्त आहे. महागाईवर सरकारचे नियंत्रण नाही. आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.मनोज घोडके जिल्हा कार्याध्यक्ष

महिला विरोधी दिशाहीन सरकार उलथून टाकू :आज देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गृहखाते, सरकार काय करत आहेत. महिला मंत्री गप्प आहे. बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या बाजूला बसून  वादग्रस्त विधान केले होते. परंतु अमृता फडणवीस गप्प बसल्या. वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. रामदेव बाबांनी माफी मागीतली तरी सुध्दा ते माफिच्या लायक नाही. राज्यपालांकडून महापुरुषांचा अवमान केला जातोय. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी खा.सुप्रिया सुळेंबद्दल जे विधान केले होते ते संतापजनक होते. सत्ताधा-यांना सत्तेचा माज आला असून हे दिशाहीन सरकार उलथून टाकण्याची वेळ आली आहे.मेहराज पटेल, शहराध्यक्षा, महिला काँग्रेस

केंद्र सरकारला हद्दपार करण्याची वेळ : केंद्र,राज्य सरकार जनतेविरोधी काम करत आहेत. महापुरुषांचा अवमान करत आहे. अशा ढोंगी सरकारला एक क्षण सुध्दा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. केंद्र सरकारने अल्पंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. हा अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. हे सरकार विद्यार्थी विरोधी असून त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. ख्वॉजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here