Love jihad l आता धर्म पाहून प्रेम करायचं का?, ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला

प्रेम केल्यावर तुरुंगात जावं लागेल की प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहावा लागेल?

love-jihad-mohammed-zeeshan-ayyub-madhya-pradesh
love-jihad-mohammed-zeeshan-ayyub-madhya-pradesh

मुंबई l लव्ह जिहाद Love jihad विरोधात मध्यप्रदेश सरकार कायदा आणणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, आम्ही विधानसभेत लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहोत. या निर्णयावर अभिनेता जिशान अय्युब zeeshan-ayyub संतापला आहे. आता धर्म पाहून प्रेम करायचं का? असा सवाल त्याने सरकारला केला आहे.

“प्रेम केल्यावर तुरुंगात जावं लागेल की प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहावा लागेल? घाबरु नका समाजात द्वेष पसरवणाऱ्याना आता कोणी टोकणार नाही. उलट टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं जाईल.

लव्ह जिहादसारख्या Love jihad एका खोट्या संकल्पनेवर कायदा तयार केला जात आहे. वाह सरकार कमाल केलीत तुम्ही.” अशा आशयाचं ट्विट करुन जिशानने आपला राग व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा l SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

उत्तर प्रदेश, हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा l ”म्हशीचं हंबरणं चालेल, पण अमृता फडणवीसांचा आवाज सहन होत नाही”

शिवराजसिंह सरकारकडून लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाईल आणि कायदा तयार झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here