Lychee : लीची हृदयविकार यकृताच्या आजारावर गुणकारी

लिची खाण्याचे आहेत अनेक फायदे

lychee-fruit-health-benefits-tips
लीची खाण्याचे फायदे lychee-fruit-health-benefits-tips

लीची हे फळ हृदयविकार यकृताच्या आजारावर गुणकारी आहे. लीची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडीत असलेले विकार काढून टाकणारे फळ आहे. रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रियासंवर्धक तसेच निद्रानाशमुक्त करणारे आहे. भारतात लीचीच्या ‘बी’पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो. (lychee-fruit-health-benefits)

ह्या फळामध्ये पोटॅशियम व तांबे ही खनिजे जास्त प्रमाणत असल्याने हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर गुणकारी आहे. या फळाला त्वचेचा खास दोस्त मानला जातो, ते त्यातील ओलीगोनॉल रसायनामुळे. या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर

बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर व अर्धपारदर्शी. या फळांमध्ये कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक असल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. मात्र याचे अतिरिक्त सेवन करणे टाळा. लिची फळ मूळचे दक्षिण चीनमधले आहे.

आरोग्याच्या महत्वाच्या टिप्स वाचा एका क्लिकर CLICK

लीची खाण्याचे हे आहेत फायदे

लीची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडीत असलेले विकार काढून टाकणारे फळ आहे.

रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रियासंवर्धक तसेच निद्रानाशमुक्त करणारे आहे.

भारतात लीचीच्या ‘बी’पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो.

ह्या फळामध्ये पोटॅशियम व तांबे ही खनिजे जास्त प्रमाणत असल्याने हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर गुणकारी आहे.

या फळाला त्वचेचा खास दोस्त मानला जातो, ते त्यातील ओलीगोनॉल रसायनामुळे. या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

लिचीत बीटा कॅरोटीन आणि ओलीग्रोनोल असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाण्यास मदत होते.

हृदयासंबंधित समस्या असलेल्यानांनी आहारात लिचीचा समावेश अवश्य करावा.

वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा आहारात जरुर समावेश करा.

सकाळच्या वेळेस लिची खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here