औरंगाबाद : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. जेवढेही ज्ञानी लोकांनी समजावून सांगावे की, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबादचा संबंध कसा आणि काय आहे. ऐतिहासिकदृष्ट्या काही संबंध असेल तर त्यावर दुमत राहणार नाही. पण केवळ महानतेवरच नाव बदलायचे असेल तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, मालेगावचेही नावही बदला अशी मागणीही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून राज्य, केंद्र सरकारकडे केली आहे.
नामकरणाचा जाती, धर्माचा संबंध नाही
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, जी-२० परिषदेसाठी विदेशातून लोक आले. शहराचे रूप पालटले आनंद झाला. छत्रपती संभाजीनगरचे नावाबद्दल मी प्रश्न करतो की, जी-२० एवढा महत्वाचा इव्हेंट असता तर चार दिवस थांबले असते. नाव बदलण्याची जिथे वेळ आली मी तेथे विरोध करीत आलो. लक्षात घ्या की, माझा नामांतराला विरोध जो आहे तो जाती आणि धर्माशी संबंधीत नाही. या जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व धर्मीय माझ्या मतदारसंघात येतात.
इम्तियाज जलील म्हणाले, मी नेहमी हीच गोष्ट केली की, सर्व महापुरुषांचे नाव शहराला देऊन त्यांना आम्ही मोठे करीत आहोत तर तो विचार चुकीचा आहे. महापुरुष आधीच मोठे आहेत. मी राज्य, केंद्राला सूचना करेल की, मला जेवढेही ज्ञानी लोकांनी समजून सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबादचे संबंध आणि ऐतिहासिक संदर्भ सांगावे.
या शहारांचे नावे बदला
इम्तियाज जलील म्हणाले, महाराष्ट्रातील कोल्हापूरचे नाव छत्रपती शाहू महाराज करावे. पुण्याची ओळख महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्यामुळे आहे. त्यांच्यामुळे महिला शिक्षण घेत आहेत. पुणे शहराला महात्मा फुले यांचे नाव द्यावे अथवा फुले करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव नागपूरला द्यावे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. मुंबईचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगरी करा कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराजांचे कार्य जाईल.
बिहारच्या औरंगाबादचे करायचे काय?
इम्तियाज जलील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाचे दुकान चालवले व त्यांनी संभाजीनगर हे नाव देऊ असे राजकारणासाठी म्हटले. बिहारमध्येही औरंगाबाद जिल्हा आहे. त्या शहराचे खासदार भाजपचे आहेत. बिहारचे औरंगाबाद चालेल पण महाराष्ट्रात औरंगाबाद नाव चालत का नाही. हे दुटप्पी धोरण त्यांचे आहे.
फडणवीस,कराड,पोलीस आयुक्तांनी फोन केले…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मला फोन करुन विनंती केली. जी-२०साठी विदेशातील पाहुणे आले आहेत. तुम्ही आंदोलन करु नका. मी आंदोलन करणार होतो. परंतु मी जी-२०मुळे आंदोलन केले नाही. असे खा.इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही मलिक अंबरचे नाव द्या म्हटलो नाही
इम्तियाज जलील म्हणाले, मालेगावचे नाव मौलाना आझाद यांच्यावरून मौलाना आबाद हे तरी करावे. 1600 च्या शतकात खडकी नाव होते हे मलिक अंबरचे योगदान काय आहे हे सर्वांना माहीत आहे. पाण्यापासून तर विकासापर्यंत मलिक अंबरचे कार्य मोठे आहे पण आम्ही मलिक अंबरचे नाव द्या असे म्हटलो नाही ते काम आम्ही केले नाही. मग मलिक अंबरचे नाव देऊ शकता.