मुंबईत खेळता-खेळता रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

mumbai-antop-hill-two-children-died-after-falling-in-pothole-news-update
mumbai-antop-hill-two-children-died-after-falling-in-pothole-news-update

मुंबई : मुंबईच्या अँटॉप हिल भागात खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे दोघा मुलांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या अँटॉप हिल भागात सीजीएस कॉलनी सेक्टर 7 मध्ये दोन मुलांचा खड्ड्यात बुडून अपघाती मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी दोन्ही मुलं तिथल्या मैदानात खेळत होती. यावेळी येथील पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये भरलेल्या पाण्यात दोन्ही मुलं अचानक पडली होती.

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची?;संजय राऊतांचा सवाल

रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू

मुलं खड्ड्यातील पाण्यात पडल्याचा प्रकार लक्षात येताच दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉक्टरानी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले. यापैकी एक जण नऊ वर्षांचा, तर दुसरा अकरा वर्षांचा होता.

Aryan Khan Bail Hearing: आर्यनला बेल की पुन्हा जेल?,जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी!

सुरक्षिततेच्या उपाय योजना न केल्याचा आरोप

पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना सुरक्षिततेच्या योग्य त्या उपाययोजना केलेल्या नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटने संदर्भात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here