अभिनेत्री अनम फैयाजचा इस्लामसाठी अभिनय क्षेत्राला रामराम

Pakistani-actress-Anum-Fayyaz-left-showbiz-for-Islam
Pakistani-actress-Anum-Fayyaz-left-showbiz-for-Islam

नवी दिल्ली: अभिनय क्षेत्रात येऊन इथे नाव कमावण्याच बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं. पण काही कलाकार असेही असतात ज्यांना हे ग्लॅमर जगत सोडून सामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगू इच्छितात. अनेक मुस्लिम अभिनेत्रींनी इस्लामसाठी अभिनय क्षेत्र सोडल्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने इस्लामसाठी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री अनम फैयाज (Anum Fayyaz)  हिने ग्लॅमर जगत सोडण्याची नुकतीच घोषणा केली आहे.

अभिनेत्री अनम फैयाजने तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून याची माहिती दिली आहे. अनमने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मनोरंजन आणि अभिनय क्षेत्र सोडत असल्याची घोषणा केली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “हा मेसेज लिहिणं खूपच कठीण आहे. कारण माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तुम्ही सर्वांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. पण आता मी ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”

 अनमने पुढे लिहिलं, “मी आता इस्लामच्या वाटेवर चालून माझं पुढचं आयुष्य जगू इच्छिते. आता माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही याचा प्रतिबिंब दिसेल. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझ्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या कधीच न संपणारं प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.” अनमने ११ वर्षांच्या अभिनयाच्या करिअरला इस्लामसाठी रामराम ठोकला आहे.

 कोणत्याही कलाकारासाठी एक यशस्वी करिअर सोडून देणं खूपच कठीण असतं. अनमसाठीही हा निर्णय कठीण होता. मात्र अखेर तिने तिच्या मनाचं ऐकलं आणि इस्लामची शिकवण आचरणात आणण्यासाठी अभिनयाचं करिअर सोडून दिलं आहे. कधी काळी स्क्रीनवर ग्लॅमर अंदाजात दिसणार अनम आता बुरख्यात दिसते. अनम एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. ती आता ३१ वर्षांची आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत अनमला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here