Maharashtra legislative council election l महाविकास आघाडी-भाजपमध्ये पहिलाच सामना

पाच जागांसाठी १ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

maharashtra-monsoon-session-2021- bjp-ruling-likely-to-clash-on-many-issue-news-update
maharashtra-monsoon-session-2021- bjp-ruling-likely-to-clash-on-many-issue-news-update

मुंबई l ‘कोरोना’मुळे लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक maharashtra-legislative-council election १ डिसेंबर  रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघातील तीन जागा, तर अमरावती व पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील दोन जागांसाठी या निवडणुका घेण्यात येणार आहेत.३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रथमच महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये टक्कर होणार आहे.

७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. या पाचही मतदारसंघात सोमवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा पहिलाच सामना रंगणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेवरील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच सदस्यांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला होता. त्यांचा कार्यकाळ संपून तीन महिने ओलांडले आहेत. परंतु ‘कोरोना’ आपत्तीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता मात्र १ डिसेंबर रोजी या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

या पाच जागांवर अनुक्रमे सतीश चव्हाण (औरंगाबाद), चंद्रकांत  पाटील (पुणे), अनिल सोले (नागपूर) हे तीन पदवीधर मतदारसंघातील तर श्रीकांत देशपांडे (अमरावती) व दत्तात्रय सावंत (पुणे) हे शिक्षक मतदारसंघातील आमदार म्हणून कार्यरत होते. भाजपचे चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर यापूर्वीच निवडून आले होते. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेतील जागाही यापूर्वीच रिक्त झालेली आहे.

एकीकडे  विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीचा तिढा कायम असतानाच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याने राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा l Police Bharti Free Training l मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; इम्तियाज जलील यांचा पुढाकार

राज्यावर कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात नियंत्रणात येत असतानाच राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे.या निमित्ताने महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा पहिलाच जंगी सामना रंगणार आहे.

तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपला डिपॉझिट वाचवणेही अवघड?

पदवीधरच्या तीनपैकी दोन जागा सध्या भाजपकडे असून भाजपपुढे या जागा राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपची सत्ता गेल्यामुळे राज्यातील राजकारणाचा कलही बदललेला दिसू लागला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष या पाच जागा एकत्रितपणे लढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडी एकत्रित लढणार – जयंत पाटील 

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित सामोरी जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. या संदर्भात तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

५ नोव्हेंबरः अधिसूचना जारी होणार.

१२ नोव्हेंबरः उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख.

१३ नोव्हेंबरः उमेदवारी अर्जांची छानणी.

१७ नोव्हेंबरः उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

१ डिसेंबरः सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान.

३ डिसेंबरः मतमोजणी

७ डिसेंबरः निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here