हाथरस बलात्कारातील आरोपी कंगनाचे भाईबंद आहेत का? राऊतांचा सवाल

shivsena-slams-kangana-ranaut-controversial-statement-on-freedom-targets-bjp-news-update
shivsena-slams-kangana-ranaut-controversial-statement-on-freedom-targets-bjp-news-update

मुंबई : सुशांत आत्महत्या प्रकरणावरून थयथयाट करणारी अभिनेत्री कंगना रणैट (kangna ranaut) हाथरस बलात्कार प्रकरणावरून गप्प आहे. त्यावरून शिवसेनेने कंगनाला सवाल केला आहे. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!,” असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत.

याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस ११० दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली.

 मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारनं अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे,” असं टीकास्त्र शिवसेनेनं डागलं आहे.

अभिनेता सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला.

मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे.  या शब्दात शिवसेनेने भाजपा आणि अभिनेत्री कंगना रणैटवर तोफ डागली.

कंगना सुशांत प्रकरणात दररोज ट्विट करुन मुंबई पोलिसांना आणि शिवसेनेला बदना करत होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला. सध्या हे प्रकरण न्यायलयात पोहोचलं आहे. तर दुसरीकडे सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच होती असा अहवालही एम्सने सीबीआयकडे सोपवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here