नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्या निधनाची खोटी पोस्ट व्हायरल; मुलीने केला खुलासा

face-check-nobel-laureate-amartya-sen-death-post-goes-viral-the-girl-nandana-deb-sen-disclosed-news-update-today
face-check-nobel-laureate-amartya-sen-death-post-goes-viral-the-girl-nandana-deb-sen-disclosed-news-update-today

नवी दिल्ली:प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन (Amartya Sen ) यांच्या निधनाची बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांची मुलगी नंदना देब सेन यांनी अमर्त्य सेन यांच्या मृत्यूच्या वृत्ताचे खंडन केले. तसेच ते पूर्णतः ठणठणीत असल्याचे सांगितले. खरं तर मंगळवारी (१० ऑक्टोबर) संध्याकाळी ५ वाजता अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांच्या नावाच्या व्हेरिफाइड नसलेल्या खात्यावरून अमर्त्य सेन यांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली गेली.

याच पोस्टचा हवाला देत आधी पीटीआय या वृत्तसंस्थेनेही मृत्यूची माहिती दिली होती. परंतु ही अफवा पसरताच अमर्त्य सेन यांच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आणि लगेचच त्यांची मुलगी नंदना देब सेन हिने त्या वृत्ताचे खंडन केले. यानंतर पीटीआयनेही आधी केलेली पोस्ट हटवली.

काय म्हणाल्या नंदना देब सेन?

वडील अमर्त्य सेन यांच्याबरोबरचा फोटो शेअर करताना नंदना देब सेन या लिहितात की, “मित्रांनो, तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद, पण ती फेक न्यूज होती. बाबा पूर्णपणे बरे आहेत. आम्ही केंब्रिज कुटुंबासह एक अद्भुत आठवडा घालवला. काल रात्री मला मुलगा मानणाऱ्या त्यांची (बाबांची) मिठी नेहमीसारखीच मजबूत होती. ते हार्वर्डमध्ये दर आठवड्याला दोन अभ्यासक्रम शिकवता आहेत. जेंडरवाली त्यांच्या पुस्तकावर काम करीत आहेत, ते नेहमीप्रमाणेच व्यस्त आहेत.” परंतु नंदना देब सेन यांचे एक्स वरील ट्विटर अकाऊंटही व्हेरिफाइड नाही.

 अमर्त्य सेन कोण आहेत?

अमर्त्य सेन हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ मध्ये कोलकाता येथे झाला. ते शांतिनिकेतन येथे जन्माला आले. प्रेसिडेन्सी कॉलेज आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथून त्यांनी शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठात ते प्राध्यापक होते. याशिवाय त्यांनी जाधवपूर विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातही अध्यापन केले.३ नोव्हेंबर १९३३ रोजी पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतन येथे जन्मलेल्या अमर्त्य सेन यांच्या अर्थशास्त्रातील योगदानामुळे त्यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल मेमोरियल पारितोषिक मिळाले.

      

 नोबेल पारितोषिक विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांची पोस्ट काय होती?

भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याचं ट्विट नोबेल पारितोषिक विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांनी X च्या माध्यमातून केले होते. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, “एक भयानक बातमी आहे. माझे सर्वात प्रिय प्राध्यापक अमर्त्य सेन यांचे काही मिनिटांपूर्वी निधन झाले आहे. नि:शब्द.” परंतु ती आता अफवा असल्याचं समोर आलं आहे.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here