मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut ) यांनी निषेध केला आहे. राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही. या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असून इतिहास त्यांना माफ करणार नाही. अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.
…तर इतिहास त्यांना माफ करणार नाही
संजय राऊत यांनी म्हटलं की, “राहुल गांधी खासदार आहेत. सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसंच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही”.
मुलीवर बलात्कार झाला, खून झाला आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही?
“ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही.
वाचा : राहुल गांधींना पोलिसांकडून मारहाण click करा
विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. “आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.





































































































































[…] […]
[…] […]