पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची आज तोंड बंद झाली; उध्दव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

cm-uddhav-thackeray-mumbai-police-and-slams-opposition-saying-now-defamers-shut-their-mouths
cm-uddhav-thackeray-mumbai-police-and-slams-opposition-saying-now-defamers-shut-their-mouths

मुंबई : नववर्षानिमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी पोलिसांशी संवाद साधला. पोलीस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवरही निशाणा साधला. मी माझ्या पोलीस बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो. आपण पोलीस प्रमुख आहात. मात्र, मी आपला कुटुंब प्रमुख आहे. त्यामुळे माझ्यावर आपली जबाबदारी आहे. मध्यंतरी पोलिसांवर बरेच आरोप झाले. मात्र, आज आरोप करणाऱ्यांची तोंड बंद झाली. पोलिसांवर कोणताही डाग लागू देणार नाही”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

रात्री बारा वाजता आपण सर्वजण एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. गेलं वर्ष हे कसं गेलं त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. गेल्या वर्षात आपल्याला ज्या वाईट गोष्टींचा अनुभव भोगावा लागला ते सगळं गेल्या वर्षात संपून, नवं येणारं वर्ष आशा, आकांशा आणि आनंद घेऊन येवो. नवं वर्ष उत्साहाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं येवो, असं आपण एकमेकांना शुभेच्छा देतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले

…कारण पोलीस हे सुद्धा माणसं आहेत

“मी गेले कित्येक वर्ष ‘मातोश्री’त आहे. काल मी ‘वर्षा’त होतो. सहज मनात आलं, सगळे एकमेकांना शुभेच्छा देत आहोत. वृतपत्र, प्रसारमाध्यमातून बातमी येत होती की, सगळ्यांचं नववर्ष हे घरातच साजरी होणार आहे.

आपण सगळ्यांनी घरात सेलिब्रेशन केलं. पोलिसांच्या आयुष्यातही नववर्ष आलं आहे. पोलिसांना सुद्धा उत्सव, सण असतात. कारण पोलीस हे सुद्धा माणसं आहेत”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

एक नागरिक म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो

“मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. तुम्ही दक्ष राहतात, तुम्ही जबाबदारी घेतात, म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना संकटात काही हजार पोलिसांना कोरोनाने गाठले. काहीजण या संकटाचा सामना करत असताना शहीद झाले. त्यांनाही आयुष्य आणि कुटुंब होतं. पण तरीही ते लढले.

कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, स्वयंसेक, महसूल यंत्रणा सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. जेव्हा संकट आलं तेव्हा आपण लॉकडाऊन घोषित केला. सगळ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देत घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं.

संकट अजूनही डोक्यावर

वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केलं असतं तर काय झालं असतं? पण तंस नाही झालं. म्हणूनच आताची परिस्थिती नियंत्रणात आहे”, असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं. “काहीजण माझ्यावर टीका करतात.

हेही वाचा : महेबूब शेख यांना कुणी तरी बदनाम करत आहे : गृहमंत्री अनिल देशमुख

तुम्ही अजूनही हे नाहीतर ते बंधनं ठेवली आहेत. कारण अजूनही संकट गेललं नाही. संकट अजूनही डोक्यावर आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये तर हाहा:कार झाला आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here