
तुमचा रक्तगट कोणता आहे यावरून तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात किंवा तुम्हाला कोणत्या आजाराचा धोका आहे हे समजू शकते. रक्तगटाच्या आधारे शास्त्रज्ञांनी हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका किती आहे यावर भाष्य केले आहे. एका अभ्यासानुसार O रक्तगट असलेल्या लोकांनी हृदयविकाराचा धोका कमी असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जगात जवळपास 42 टक्के लोकांचा रक्तगट हा O आहे. या लोकांना हार्ट अटॅकचा धोका इतरांच्या तुलनेत कमी आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या अभ्यासानुसार O रक्तगट असलेल्यांनाही हृदयविकाराचा धोका कमी आहे. मात्र A, B आणि AB रक्तगट असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि तणाव असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो असं बोललं जात होतं, मात्र आता नवीन अभ्यासानुसार रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सारख्या घटकांव्यतिरिक्त रक्तगटही हृदयविकाराच्या जोखमीवर परिणाम करतो.