PM Kisan योजनेचा नववा हप्ता आज; 9.75 कोटी शेतक-यांना होणार लाभ!

pm-modi-to-release-9th-instalment-of-pm-kisan-scheme-on-today-check-beneficiaries-list-at-pmkisan-gov-in-news-update
pm-modi-to-release-9th-instalment-of-pm-kisan-scheme-on-today-check-beneficiaries-list-at-pmkisan-gov-in-news-update

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi आज पीएम किसान योजनेचा PM kisan Scheme नववा हप्ता जारी करणार आहेत. आज सोमवार (9 ऑगस्ट) दुपारी 12.30 वाजता एका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील 9.75 कोटी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर 19,500 कोटी रुपये वर्ग करणार आहेत.

आज देशभरात ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.

>>PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.

>>त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.

>>Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.

>>त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.

>>त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.

काय आहे पीएम किसान योजना? PM kisan Scheme

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2019 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. आतापर्यंत एकूण रक्कमेचा विचार करता 1.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना 8 हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here