आता महिला पोलिसांना आठ तास ड्यूूटीचे गिफ्ट

महिला दिनानिमित्त नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील महिला पोलिसांना अनोखी भेट

women-police-work-eight-hours-order-commissioner-of-police-sanjay-pandey-news-update
women-police-work-eight-hours-order-commissioner-of-police-sanjay-pandey-news-update

मुंबई:महिला दिनानिमित्त नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईतील महिला पोलिसांना अनोखी भेट दिली आहे. पांडे यांनी मुंबईतील महिला पोलिसांना आठ तासच काम देण्याचे कार्यालयीन आदेश दिले आहेत.

कुटुंब आणि कर्तव्य अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला पोलिसांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. विशेष म्हणजे पांडे राज्याचे पोलीस महासंचालक असताना राज्यात महिला पोलिसांचा कामाचा कालावधी आठ तास करण्याचे आदेश दिले होते.

टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मुंबई पोलिसांनी अद्याप त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे पांडे यांनी पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर दुसऱ्याच आठवडय़ात महिला पोलिसांचा कामाचा कालावधी निश्चित केला आहे.

पांडे हे राज्याचे पोलीस महासंचालक असताना कर्तव्याच्या वेळांपेक्षा अधिक काळ काम करावे लागत असल्यामुळे कौटुंबिक जीवनावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी महिला कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. त्यानंतर पांडे यांनी राज्य पोलीस दलात महिलांच्या कामाचे तास आठ तास करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर मुंबईतही  पांडे यांनी सोमवारी याबाबतचे आदेश देऊन दोन पर्यायांमध्ये आठ तास कामाबाबत पर्याय दिले आहेत. महिला अंमलदारांशी चर्चा करून त्यातील एक पर्याय निवडावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आठ, आठ तासांच्या तीन सत्रांमध्ये महिला पोलीस काम करणार आहेत. यापूर्वी मुंबईत दत्ता पडसलगीकर पोलीस आयुक्त असताना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील ८ तास कालावधी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here