मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार नाहीत!

मुख्यमंत्री, राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले

chief-minister-uddhav-thackeray-will-not-go-to-pune-to-receive-prime-minister-narendra-modi
chief-minister-uddhav-thackeray-will-not-go-to-pune-to-receive-prime-minister-narendra-modi

मुंबई l पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात Pune उपस्थित राहणार नाहीत. शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचे स्वागत करायला मुख्यमंत्री हजर असतात. परंतु पंतप्रधान कमी वेळ थांबणार असल्यामुळे मुख्यमंत्री, राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे.

मोदी आज देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना Covid-19 प्रतिबंधक लसीच्या Coronavirus vaccine संशोधन कार्याचा आढावा घेणार आहेत. अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याला नरेंद्र मोदी या निमित्तानं धावती भेट देणार आहेत. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला Serum Institute मोदी दुपारी भेट देणार आहेत. तिथे ते कोरोना प्रतिबंधक Coronavirus लसीवर सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत.

हेही वाचा l महाराष्ट्र हादरलं,औरंगाबादेत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

त्या आधी सकाळी नरेंद्र मोदी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क कंपनीला भेट दिली. अहमदाबादमधल्या चांगोदर औद्योगिक क्षेत्रातल्या झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाला सकाळी साडे नऊ वाजता भेट देणार आहेत. तिथे ते सुमारे तासभर असतील. झायडसची झायकोविड लसीची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी सध्या सुरू आहे.

हेही वाचा l पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल;शिवसेनेने भाजपाला डिवचले

त्यानंतर मोदींनी हैदराबादमधल्या भारत बायोटेकला दुपारी भेट दिली. भारत बायोटेकनं तयार केलेल्या लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सुरू आहे. या ठिकाणी तासभर थांबून, मोदी पुण्याला येतील. पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटला ते दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी भेट देणार आहेत. मोदी या ठिकाणी एक तास असतील. त्यानंतर ते दिल्लीला परततील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here