दूरसंचार कंपनी एअरटेलनं Airtel ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. ग्राहकांना ४ जी स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एअरटेल आता लोन देणार आहे. एअरटेलची २ जी सेवा वापरणारे ग्राहक आपल्या आवडीचा ४ जी फोन विकत घेण्यासाठी एअरटेलकडून Airtel लोन घेऊन फोन खरेदी करू शकतात.
या ऑफरसाठी काही रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागणार आहे. त्यानंतर एका प्लॅनसह त्यांना स्मार्टफोन देण्यात येईल. एअरटेलनं स्मार्टफोसाठी लोन देण्यासाठी आयडीएफसी या बँकेसह करार केला आहे.
हेही पाहा l VIDEO l चक्क ५ वर्षांची चिमुरडी वाजवतेय ड्रम
एअरटेलची २ जी Airtel सेवा वापरणाऱ्या ग्राहतांना ४ जी अथवा ५ जी तंत्रज्ञान असलेला फोन घेण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहक किमान ६० दिवस एअरटेलचा Airtel अॅक्टिव्ह ग्राहक असणं अनिवार्य आहे.
या ऑफर अंतर्गत ग्राहकांना एअरटेलच्या Airtel लँडिंग पार्टनरला ३ हजार २५९ रूपयांच्या डाऊन पेमेंटला ६०३ रूपये प्रति महिन्याप्रमाणे द्यावे लागतील. लोनचा कालावधीही १० महिन्यांचा असेल. म्हणजेच ग्राहकाला एकून ९ हजार २८९ रूपये द्यावे लागणार आहे.
एअरटेलच्या Airtel माहितीनुसार मोबाईलसह किंमत ९ हजार ७३५ रूपये असणार आहे. यासोबत एअरटेलचा २८ दिवसांचा २४९ रूपयांचा पॅकही मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि १.५ जीबी डेटा देण्यात येतो.
हेही वाचा l Blue Moon l शनिवार ३१ ऑक्टोबरला ‘ब्लू मून’ चा योग
३३० दिवसांच्या हिशोबानं ग्राहकांना या पॅकसाठी २ हजार ९३५ रूपये द्यावे लागणार आहे. त्यामुळे याची एकूण किंमत ९ हजार ७३५ रूपये होईल.























































































































































