कोलांटउडीचे बादशहा, करप्शन क्वीनला शरण

'सामना'तील सोनिया गांधींच्या संपादकीयावरून संजय राऊतांवर भाजपाचा निशाणा

Shivsena-mp-sanjay-raut-on-pankaja-munde-statement-about-bjp-party-news-update-today
Shivsena-mp-sanjay-raut-on-pankaja-munde-statement-about-bjp-party-news-update-today

मुंबई l पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं आत्मचिंतन करताना कांग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभवामुळे निराश झालेल्या नेत्यांना पुन्हा सक्रिय होण्याचा डोस दिला. काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या मंथनावरून शिवसेनेनं ‘सामना’त ‘सोनियांचा संदेश’ असा अग्रलेख लिहित काही मुद्दे उपस्थित केले होते. या अग्रलेखावरून भाजपाने सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. सोनिया गांधींबद्दल सामना पूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या करप्शन क्विन वृत्ताचा हवाला देत भाजपाने राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

सोनियांचा संदेश या मथळ्याखाली सामनातून प्रकाशित करण्यात आलेल्या अग्रलेखावरुन भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दोपहर का सामना या हिंदी दैनिकातील वृत्त आणि आज प्रकाशित करण्यात आलेल्या अग्रलेखाचा मथळा पोस्ट केला आहे. हा फोटो ट्विट करण्याबरोबरच उपाध्ये यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता टीकास्त्र डागलं आहे.

हेही वाचा: Ramdan Eid 2021 l रमजान ईद निमित्ताने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 “करप्शन क्वीन ते सोनियाचा संदेश… अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले. कोलांटउडीचे बादशहा, करप्शन क्वीनला शरण,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी राऊतांना डिवचल आहे.

शिवसेनेनं अग्रलेखात काय म्हटलंय?

“काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करावे. सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मनात रोष निर्माण होतोय. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, करोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला लागली. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ‘ट्विटर’च्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे.

हेही वाचा:  Lemon Tea Benefits l लेमन टी ‘या’ आजारांवरही फायदेशीर

पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे करोना काळात गर्दी करणे नाही. तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल. काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा,” असं शिवसेनेनं म्हटलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here