मुंबई : ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस ऑफ महाराष्ट्र (All India Professionals Congress of Maharashtra) च्या वतीनं कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Comedian Munawar Faruqui) ला आमंत्रित करण्यात आलं होतं. इथं आयोजित केलेल्या शोमध्ये त्यानं सादरीकरण केलं. हिंदुत्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे देशातल्या विविध शहरांमधले मुनव्वरचे जवळपास 16 शो शो रद्द करण्यात आले आहे. फारुकी आता 7 जानेवारीला पुण्यात आणि 16 जानेवारीला कोलकाता इथं शो करणार आहे. कोलकाता कार्यक्रमाची तिकिटंही विकली गेली आहेत.
न्यायालयानं दिलाय जामीन
मागच्या काही दिवसांत मुनव्वरचे बेंगळुरू, गुरुग्राम, रायपूर, सुरत, अहमदाबाद, वडोदरा, गोवा आणि मुंबई इथले शो रद्द करण्यात आले. मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये जानेवारीमध्ये त्याला अटक झाल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला सतत लक्ष्य केलंय. एका कथितपणे हिंदू देवतांचा अवमान केल्याचा आरोप काही गटांकडून करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी काहीही सिद्ध होऊ शकलं नाही, त्यामुळे न्यायालयानं त्याला निर्दोष मुक्त केलं. मात्र या ना त्या कारणानं हिंदुत्ववादी गट त्याच्याविरुद्ध कारस्थान करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणचे शो रद्द होताहेत. मात्र मुंबईत काँग्रेसनं त्याला आमंत्रित करत त्याला सादरीकरणाची संधी दिली.
Comedian #MunawarFaruqui finally performs his stand up comedy act at the Y B Chavan Centre in Mumbai. Event organised with support from the @AIPCMaha @mathewmantony @sumedhbgaikwad #munawarfaruqi pic.twitter.com/jSTLUd53Se
— Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳 (@dhavalkulkarni) December 18, 2021
‘अशाप्रकारे विरोध घटनाबाह्य’
याविषयी काँग्रेसनं आपल्या निवेदनात म्हटलं, की मुनव्वर फारुकीचा कार्यक्रम कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण झाला. मागच्या काही दिवसांपासून आयोजकांना धमक्या येत होत्या. मुनव्वरचा शो झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा धमक्या मिळाल्याचं आयोजकांनी सांगितलं. ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसनं म्हटलं, की कलाकारांना जोपर्यंत ते घटनेचं पालन करतात आणि सर्व धर्मांचा आदर करतात, तोपर्यंत त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असावं. एखाद्याच्या विचारांशी असहमत असाल जरी तरी अशाप्रकारे विरोध घटनाबाह्य आहे.
We promised on 27th Nov & We delivered on 18th Dec.
16 consecutive cancellations & #MunawarFaruqui performs.Good luck for more.
@ProfCong @AIPCMaha & @INCIndia stands to facilitate the rights of every citizen,as we firmly believe in that.
Long live democracy & constitution. https://t.co/qfdkBWtdin pic.twitter.com/j7mSgAXDmm
— मॅथ्यू अँटनी|Mathew Antony|മാത്യു ആന്റണി (@mathewmantony) December 19, 2021
पुणे, कोलकात्यात शो
काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही फारुखीची पाठराखण केली. ट्विटमध्ये ते म्हणाले, की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. ऑल इंडियन प्रोफेशनल काँग्रेसचे सदस्य त्यासाठी उभे आहेत. दरम्यान, फारुकी आता 7 जानेवारीला पुण्यात आणि 16 जानेवारीला कोलकाता इथं शो करणार आहे. कोलकाता कार्यक्रमाची तिकिटंही विकली गेली आहेत.