‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा राजीनामा घ्या: हर्षवर्धन सपकाळ

पेट्रोलच्या किमतीत पाणी विकून वाहनधारकांची घोर फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी.

'E-20' is a major scam by Modi, Gadkari, and Fadnavis; Union Minister Nitin Gadkari should resign: Harshvardhan Sapkal
'E-20' is a major scam by Modi, Gadkari, and Fadnavis; Union Minister Nitin Gadkari should resign: Harshvardhan Sapkal

मुंबईः पेट्रोलमध्ये इथेनॉल ethanol मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झालेहे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendraकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजानीमा घ्यावा अशीमागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Sapkal यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले कीई-२० चा निर्णय २०३० ला लागू होणे अपेक्षित होते पण मोदी सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ मिळावा यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला. इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे येत आहेत. आखातातील इंधन तुटवड्याचा फायदा उचलण्यासाठी मोठा घोटाळा केल्यात्याचा पर्दाफाश झाला पाहिजे. नितीन गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहनं बंद पडलीइथेनॉलची वकिली करणारी व्यक्ती नितीन गडकरीच आहेत तसेच या घोटाळ्यात अनेक दलालही आहेतत्यांचाही लवकरच पर्दाफाश होईल. पेट्रोलच्या किंमतीत पाणी विकून लोकांनी मोठी फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजेअसेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

RSS चा अजेंडा राबवण्यासाठी फडणवीस दिल्लीला!

देवेंद्र फडणवीस यांच्याबदद्ल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे कारस्थान सुरु आहेआणि त्यांनाही दिल्लीत जाण्याची घाई झालेली आहे. हिंदी लादण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग होता. महायुती सरकारमध्ये त्यांची विकेट काडण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह आहेतफडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत. भाजपा आरएसएसलाही त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी रेशीम बागेचा खास माणूस हवा आहे व ते फडणवीस आहेत. मनुस्मृतीतील श्लोक टाकणेचार्तुवर्ण व्यवस्था पुन्हा आणणेसंविधान व शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी फडणवीस हेच योग्य व्यक्ती आहेतम्हणून दिल्लीत त्यांना शिक्षणमंत्री बनवण्याचा घाट घातला जात आहेअसेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here