
नवी दिल्ली: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir-singh यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख Anil-deshmukh यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील H-k-patil यांनी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. चर्चा केली. माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत कोअर कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat आणि अशोक चव्हाण Ashok Chavan मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
निवेदनात काय म्हटलं आहे…

“महाराष्ट्रातील स्थितीविषयी विधीमंडळ नेता, वरिष्ठ मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसोबत मी चर्चा केली. माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत कोअर कमिटीचे सदस्य असणारे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
हेही वाचा: अनिल देशमुखांची खुर्ची शाबूत;राजीनामा देणार नाही!
अनिल देशमुख यांनी निवेदन प्रसिद्ध करत मुख्यमंत्र्यांना योग्य प्रकारे तपास करण्याची विनंती केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आधीच प्रसारमाध्यमांशी चर्चा करत ‘आम्ही राजीनाम्यावरही चर्चा करु. जे पर्याय असतील त्यावर चर्चा होईल, राजीनामादेखील एक पर्याय आहे’ असं सांगितलं,” असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
हेही वाचा: परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’, बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल: शिवसेना










































































































































