मेहबूब शेख प्रकरणात ट्विस्ट; पीडित मुलीचं घुमजाव, चित्रा वाघ, सुरेश धसांविरोधात तक्रार

Mehebub Sheikh Case File Against BJP Chitra Wagh And Suresh Dhas news update
Mehebub Sheikh Case File Against BJP Chitra Wagh And Suresh Dhas news update

औरंगाबाद: राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehebub Sheikh) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरूणीने आत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून दाखल केला होता असा खुलासा करत पीडित तरूणीने सुरेश धस आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. औरंगाबादमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान “या तरूणीने माझ्यावर तक्रार दाखल केली होती पण तीने आता चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मी पहिल्यांदाही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय की, सत्य परेशान हो सकता है परंतु पराजित नही.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे.

“ज्या मुली आमच्याकडे तक्रार घेऊन येतात त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कुचिक प्रकरणातही माझ्यावर असाच आरोप करण्यात आला. तीने माझ्यावर तक्रार दाखल केली हे मला माध्यमांद्वारे कळतंय.” असं भाजपच्या चित्रा वाघ यांनी सांगितलं.

सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची माझी तयारी

“चित्रा वाघ अशा तक्रारी आणि एफआयआरने थांबणारी नाही. ज्या ठिकाणी राजकारण मध्ये येत असतं त्या ठिकाणी अशा घटना घडणं स्वाभाविक आहे. या प्रकरणी सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची माझी तयारी आहे.” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान २८ डिसेंबर २०२० मध्ये एका २९ वर्षाच्या तरूणीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर आत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. औरंगाबादमधील सिडको पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्याच तरूणीने चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here