
पुद्दुचेरी: पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सरकार कोसळलं आहे. पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. दरम्यान व्ही नारायणसामी V- Narayanaswamy यांनी पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे.
नारायणस्वामी पुढे म्हणाले की, “आम्ही द्रमुक आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. आम्ही सर्व पोटनिवडणूकीत विजय प्राप्त केला, यावरून गोष्ट स्पष्ट होते की, पुडुचेरीच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.”
वाचा: मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला ‘या’ खासदाराचा मृतदेह
व्ही. नारायणस्वामींच्या नेतृत्वातील काँग्रेंसच्या चौथ्या आमदाराने राजीनामा देताच मोदी सरकारने घाईगडबडीत उपराज्यपाल किरण बेदी यांना उपराज्यपाल पदावरुन हटवले. त्याजागी तेलंगाणाचे राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांना पदभार दिला. उपराज्यपाल सुंदरराजनने व्ही. नारायणस्वामी सरकाराला 22 फेब्रुवारीपर्यंत बहूमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहे.
11 महिन्यात काँग्रेसने गमावले दुसरे राज्य
काँग्रेस पक्ष 2020 च्या सुरुवातीला राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेत होते. गेल्या वर्षी काँग्रेसच्या हातून सर्वात आधी मध्य प्रदेश गेले. ज्योतिरादित्य सिंधियांच्या समर्थक आमदारांनी कमलनाथ सरकारच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर कमलनाथ यांना मार्च 2020 मध्ये राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता काँग्रेसने पुद्दुचेरी गमावले आहे.
वाचा: महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती
काँग्रेस पक्षाचे सरकार आता राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रात सत्तेत आहे. महाराष्ट्रात ते शिवसेना-एनसीपीसोबत युतीत असून राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये स्वबळावर सत्तेत आहे.
यात राजस्थानचे प्रकरण नाजूक आहे. कारण, सचिन पायलट यांनी जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंड केले होते. गहलोत यांनी एकवेळा बहूमत सिद्ध केले असून पुन्हा बंड झाल्यास अजून बहुमत चाचणी द्यावी लागेल.
बहूमत सिद्ध करण्याच्या एक दिवस आधी दोन राजीनामे
काँग्रेसच्या व्ही. नारायणस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी बहूमत चाचणी होणार होती. परंतु, एक दिवस आधी काँग्रेसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि मित्रपक्ष द्रमुकेच वेंकटेशन यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर नारायणस्वामी सरकार अल्पमतात आले आणि सरकार वाचवणे कठीण झाले.
किरण बेदींना नायब राज्यपाल पदावरुन हटवलं
काही दिवसांपूर्वीच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. मागील काही काळापासून बेदी आणि मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेदी यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
यासंदर्भात वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे.






















































































































































