EKNATH KHADSE l एकनाथ खडसे १७ तारखेला हाती घड्याळ बांधणार

भाजपच्या अनेक नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश,महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडणार

it-was-clear-at-gopinath-fort-that-i-would-leave-the-bjp-eknath-khadse
Eknath Khadse will join the NCP on Friday

मुंबई l भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) भाजपला रामराम ठोकून घटस्थापनेच्या दिवशी १७ तारखेला राष्ट्रवादीत NCP) प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. मुक्ताईनगरमध्ये प्रवेश कधी करायचा या विषयावर एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला एकनाथ खडसे यांचे समर्थक आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते देखील उपस्थितीत होते. दरम्यान, या बैठकीत येत्या १७ तारखेला घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश करायचा यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

ग्लोबल हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्ताने एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार होते. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे मंगळवारी जामनेरमध्ये हजर होते. परंतु, एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले. दरम्यान एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे  MP Raksha khadase) या कार्यक्रमाला हजर होत्या.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतर  खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्र मधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here