राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर अॅट्रॉसिटी दाखल करा; रिपाइं खरात गटाची पोलिसांकडे तक्रार

file-an-atrocity-on-the-governor-Bhagat-Singh-Koshyari ripe-kharat-group-demand
governor-bhagatsingh-koshyari-statement-on-shivaji-maharaj-central-minister-nitin-gadkari-ncp-sharad-pawar-news-update-today

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार यांच्याशी करून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रा सिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे.

या संदर्भातील त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. नरवडे यांनी तक्रारीत म्हटले की, डॉ. आंबेडकर संविधान निर्माते आहेत. त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. त्यांचा अपमान करण्याचे कृत्य संवैधानिक पदावर विराजमान असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना शोभणारे नाही.

हेही वाचा: कोश्यारी, भाजपाला नाना पटोलेंचा जाहीर इशारा, म्हणाले, “माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही’’!

ते जाणूनबुजून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असल्याचे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी. या वेळी शहर अध्यक्ष योगेश उबाळे, पवन पवार, संतोष भिंगारे, संदीप अहिरे, विराज मगरे, करण सोनवणे, स्वप्निल नरवडे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा : महाराष्ट्रातील जनता तुमच्या सरकारवर थुंकतेय, 72 तास उलटले तरीही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस गप्प का? :संजय राऊतांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here