Guru Nanak Jayanti 2022: गुरू नानकांच्या या तीन शिकवणीमध्ये दडलेला आहे प्रगतीचा मार्ग!

guru-nanak-jayanti-2022-the-path-to-progress-lies-in-these-3-teachings-of-guru-nanak-there-is-happiness-and-peace-in-life-update
guru-nanak-jayanti-2022-the-path-to-progress-lies-in-these-3-teachings-of-guru-nanak-there-is-happiness-and-peace-in-life-update

Guru Nanak Jayanti 2022 : सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासह शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्म यापलीकडे जाऊन एकतेची शिकवण आणि ‘कलि महि राम नाम सारु’चा उपदेश देणाऱ्या गुरू नानकदेव यांची आज जयंती आहे. कार्तिक पौर्णिमेला येणारी गुरू नानकदेव यांची जयंती प्रकाश पर्व म्हणूनही साजरी केली जाते.

इक ओंकार सतनाम, करक परखु निरभऊ|

निरबैर, अकाल मूरति, अजूनी सैभं गुर प्रसादि|,

गुरू नानकांनी समाजाला दिलेला सगळ्यात महत्त्वाचा संदेश. ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे, त्यामुळे प्रत्येकांशी आपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. गुरु नानकजी यांनी तीन महान शिकवणी आपल्याला दिल्या आहे, याशिकवणी कोणत्या आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

 गुरु नानकजी 3 महान शिकवणी (Guru Nanak Ji 3 Big lessons)

>>नाम जपना

देवाच्या नावाचा जप करणे म्हणजे नाम जपना. जेव्हा कोणी देवाचे नाव घेतो, तेव्हा तो भगवंताशी संवाद साधतो. यासाठी कोणच्याही विधीची गरज नाही. एकाग्रतेने देवाचे नाव उच्चारणे, एकाग्रतेने विचार करणे येथे सांगितले आहे. किरत करना म्हणजे प्रामाणिकपणे श्रम करून जीवनात कमाई करणे. सेवा, सेवेच्या संकल्पातील किरत म्हणजे कार्य करत राहणे. शीख धर्मीयांसाठी सेवा आणि जप याला महत्त्व आहे. श्रीमंत जमीनदारांच्या घरी श्रीमंत जेवणापेक्षा कठोर परिश्रम करणाऱ्याकडे गुरूंनी भोजन करणे पसंत केले होते. यातून श्रमप्रतिष्ठेचा संदेश देण्यात आला आहे.नामजप केल्याने मन एकाग्र होते आणि आध्यात्मिक-मानसिक शक्ती प्राप्त होते. नानकजींनी भगवंताच्या नामजपाच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत, पहिला जप संगतीत राहून करावा, दुसरा नामजप एकांतात करावा.

 >>प्रामाणिक काम करणे.

जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला नेहमीच प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. नानक देवजींनी म्हटले आहे की,

सोचै सोचि न होवई, जो सोची लखवार। चुपै चुपि न होवई, जे लाई रहालिवता | याचा अर्थ नुसत्या विचार करून कोणत्याच समस्येवर उपाय निघत नाही, त्यासाठी मनापासून काम  करावे लागते तेव्हाच आपल्याला आपले ध्येय गाठता येते. नानकजी म्हणतात की खरा साधक तोच असतो जो सत्कर्म करताना भगवंताचे स्मरण करतो.

>>दान करणे.

दान हा सर्वात मोठा धर्म आहे. गुरु नानकजी म्हणतात की ज्याच्यात त्यागाची भावना असते, त्याच्या जीवनात विश्वासाची शक्ती कधीच कमी पडत नाही. आपले सुख, आनंद वाटून घेऊन परस्परांची का‌ळजी घेणे म्हणजे वंद चखना. लोकांनी केवळ स्वत:साठी संपत्ती न वापरता ती इतरांच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे. एकट्याने खाण्यापेक्षा एकत्रित येऊन, एकमेकांना वाटप करून खाल्लेले अन्न पवित्र मानले आहे. यातूनच लंगरची संकल्पना सुरू झाली. लंगर म्हणजे एकप्रकारे सामुदायिक स्वयंपाकघरच. जाती, रंग, धर्म आणि शर्यतीच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करण्यात गुरू नानक देवजी यांचा विश्वास नव्हता. त्यांनी केवळ दोन प्रकारचे लोक सांगितले आहेत. गुरुमुख, ईश्वर-केंद्रित आणि मनमुख, जे आत्मनिर्भर आहेत. गुरुमुख स्वत:ला भगवंताकडे समर्पित करतो. तो सत्य मानतो आणि मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करतो. शीख समुदायातील लोक त्यांच्या कमाईचा एक दशांश भाग दानासाठी काढतात, याला दसवंध म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here