Havells Refrigerator : हॅवेल्सचे रेफ्रिजरेटर बाजारात, २५ मॉडेल लाँच

havells-enters-refrigerator-market-lloyd-brand-launches-25-models
havells-enters-refrigerator-market-lloyd-brand-launches-25-models

नवी दिल्ली : प्रसिध्द Havells इलेक्ट्रिकल कंपनीने रेफ्रिजरेटर (Refrigerator) मार्केटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने गुरुवारी आपल्या टिकाऊ ग्राहक वस्तू युनिट लॉयडच्या माध्यमातून रेफ्रिजरेटर बाजारात प्रवेश करण्याची घोषणा केली.

लॉय Lloyd) हा ब्रँड एअर-कंडिशनर, एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी २५ नवीन इनव्हर्टर तंत्रज्ञान आधारित डायरेक्ट कूल (डीसी), फ्रॉस्ट फ्री आणि साइड-बाय-रेड रेफ्रिजरेटर मॉडेल सादर केले आहेत.

दिवाळीपर्यंत आणखी २५ नवीन मॉडेल्स बाजारात

दिवाळीपर्यंत आणखी २५ नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. याव्यतिरिक्त, लॉयड देखील नोव्हेंबरमध्ये डिश वॉशर हे नवं प्रोडक्ट आणण्याची योजना आखत आहे. लॉकडाऊन दरम्यान लोक त्यांच्या घरून काम करत आहेत. त्यामुळे डिश वॉशरसारख्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.

लॉयडचे रेफ्रिजरेटर १९० ते ५८७ लिटर क्षमतेमध्ये उपलब्ध असतील. या मॉडेल्सची प्रारंभिक किंमत १०,००० ते ८४,९९० असेल. हे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (बीईई) च्या 2020 रेटिंग नियमांचे पालन करण्यात आले आहे. ते म्हणाले की, एसी मार्केटमध्ये लॉयड पहिल्या तीन ब्रँडमध्ये आहे. हॅवेल्सने मे २०१७ मध्ये लॉयडचं अधिग्रहण केले होते.

Havells lioyd refrigerator
Havells lioyd refrigerator

लॉईडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शशी अरोरा म्हणाले की, ‘आज आम्ही डीसी, साइड-बाय-साइड, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरची सीरीज आणत आहोत. मेक इन इंडिया उपक्रमानुसार कंपनी आपल्या रेफ्रिजरेटरची संपूर्ण सीरीजचं उत्पादन भारताच तयार करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here