Bhandara Hospital fire : राज्यातील रुग्णालयांचे तातडीने फायर सेफ्टी ऑडिटचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश

Ncp-ajit-pawar-said-that-there-are-only-discussions-of-new-political-equations-there-is-no-truth-in-them-news-update-today
Ncp-ajit-pawar-said-that-there-are-only-discussions-of-new-political-equations-there-is-no-truth-in-them-news-update-today

मुंबईः भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या District hospital bhandara विशेष नवजात शिशु देखभाल विभागात SNCU आग लागून दहा अर्भकाचा मृत्यू  झाला. या घटनेनंतर सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी राज्यातील सर्व रुग्णालयात तातडीने फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. एसएनसीयूमध्ये एकूण १७ नवजात बालके होती. त्यापैकी ७ बालकांना वाचवण्यात यश आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश दिले आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत १० नवजात बालकांचा मृत्यु झाला, ही घटना अतिशय दुःखद आहे. या बालकांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

त्यांच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करेल हा विश्वास आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव, दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू!

यह भी पढ़ें : महाराष्ट्र मे बड़ा हादसा: भंडारा के जिला अस्पताल में आग लगने से 10 बच्चो की मौत

यह भी पढ़ें : Madhavsinh Solanki : गुजरात के पूर्व CM माधवसिंह सोलंकी का निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here