
Maharashtra Zilla Parishad Election 2026 : महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार असून 5 फेब्रुवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झालं असून मतदारसंघात आचारसंहिता जाहीर झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे. मतदार याद्यांचा कार्यक्रम आणि प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानाच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आजच्या या पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष निवडणुकांचे वेळापत्रक, आचारसंहिता आणि टप्प्यांची घोषणा घोषणा करण्यात आली आहे.
कोणत्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार ?
छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. 12 जिल्हा परिषदेचे आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित 20 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.






















































































































































































