आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील जमावबंदी कायम पण घाबरू नका!

aaditya-thackeray-slams-devendra-fadnavis-over-tata-airbase-and-many-projects-transfer-from-maharashtra-to-gujrat-news-update-today-update

मुंबई : मुंबई पोलिसांनी शहरातील जमावबंदीची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढवली. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामुळे संपूर्ण टाळेबंदी, संचारबंदी जारी होणार, असा गैरसमज पसरल्याने काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्यासह राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून या आदेशान्वये नवी बंधने लादण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.

या आदेशान्वये नवी कोणतीही बंधने लादण्यात आलेली नाहीत, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबिरसिंह, पोलीस दलाच्या प्रवक्त्या एन. अंबिका यांनी स्पष्ट केले. आदित्य यांनीही संध्याकाळी ट्वीटद्वारे अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. मुंबई पोलिसांनी ३१ ऑगस्टला जारी केलेल्या आदेशाची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढविली आहे. आधीच्या आणि आताच्या आदेशांमध्ये काही बदल नाहीत, नवे र्निबध नाहीत, असे स्पष्ट केले.

वैद्यकीय आणीबाणीसह अत्यावश्यक सेवा आणि शासनाची परवानगी असलेल्या व्यक्तींना संचारबंदीचे नियम लागू नसतील. शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली. या प्रत्येक टप्प्यात ठराविक सेवा, व्यवसायांना मर्यादीत प्रमाणात मुभा दिली. शासनाने मुभा दिलेल्या सेवा, व्यवसायाशी संबंधीत व्यक्ती पुर्वीप्रमाणेच प्रवास करू शकतील.

राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कलम 144 अंतर्गत संचारबंदीच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण देत नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलंय. तसेच मुंबईत कोणतेही नवे निर्बंध लादण्यात आले नसून आधीच्या आदेशालाच मुदतवाढ दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कलम 144 अंतर्गत देण्यात आलेले आदेश 31 ऑगस्टच्या मागील आदेशाला दिलेली मुदतवाढ आहे. नव्याने कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही. कृपया ही माहिती शेअर करा आणि घाबरु नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here