स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टिळक भवन येथे आढावा बैठक संपन्न.

In the local elections, there was massive use of money by the ruling party; the decision regarding the alliance will be taken by the local leadership: Ramesh Chennithala.
In the local elections, there was massive use of money by the ruling party; the decision regarding the alliance will be taken by the local leadership: Ramesh Chennithala.

मुंबई: राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतातया निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईलअसे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला Ramesh chennithala यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथलाप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळअखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरेनसीम खानगोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेसहप्रभारी यु. बी. व्यंकटेशबी. एम. संदीपकुणाल चौधरीरेहाना रेयाज चिस्तीआमदार भाई जगतापप्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटीलमोहन जोशी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले कीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा प्रचंड वापर केला जात आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात आघाडी आहे. भाजपा महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही. शेतकरीबेरोजगारीमहिलाकायदा सुव्यवस्था याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत विजयी करेलअसा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले कीमुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे तशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मुंबई वगळता इतर ठिकाणी समविचारी पक्षांशी चर्चा सुरु आहे पण जेथे आवश्यकता आहे तेथे भाजप महायुती सोडून इतर समविचारी पक्षांशी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. राज्यातील प्रमुख नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची विभागवार जबाबदारी दिलेली आहेरणनिती ठरवणेप्रचार यात ते सक्रीय आहेत असेही चेन्नीथला यांनी सांगितले..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले कीमहानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात टिळक भवनमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नुकतीच दोन दिवस सविस्तर चर्चा झालेली आहे. राज्यातील २८८ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुका व २८ महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसदर्भात आज चर्चा करण्यात आली आहे. आमचा लढा वैचारिक असून राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेस पक्ष लढा देत आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाहीउडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न दिसत आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहेमहाराष्ट्र विकण्याचे काम सुरु आहेअसेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here