बिग ‘बी’ मोठेपणा दाखवा, मनसेची अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोस्टरबाजी

मुंबई महानगरपालिकाने जर या रस्ता रुंदीकरणासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात मनसे मुंबई महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

mns-poster-on-amitabh-bachchan-pratiksha-bungalow-for-road-winding-work-bmc-news-update
mns-poster-on-amitabh-bachchan-pratiksha-bungalow-for-road-winding-work-bmc-news-update

मुंबई l ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोर Pratiksha Bungalow मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याचं काही भाग जात आहे. या कामात अमिताभ बच्चन यांनी मुंबई महापालिकेचं सहकार्य करावं असं मनसेनं MNS पोस्टरच्या माध्यमातून म्हटलं आहे.

मनसेने प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टरबाजी लावले आहेत. बिग “बी” आपला “बिग” हार्ट दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”, अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावे, अशा आशयाचे पोस्टर परिसरात मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांच्यामार्फत लावण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील जुहू इथल्या संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 2017मध्ये मुंबई महानगरपालिकाने आजू बाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला. मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतही उत्तर मुंबई महानगरपालिकेला दिले नाही. दरम्यान 2019 मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली गेली. पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही.

मनसे आक्रमक

संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडी होते आहे. या वाहतूक कोंडीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर या रस्त्याचे रुंदीकरण झाले तर परिसराती वाहतूक कोंडी आणि लोकांचा त्रास देखील कमी होईल. यासाठी मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिकाने जर या रस्ता रुंदीकरणासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात मनसे मुंबई महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन करेल, अशा देखील इशारा मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी दिली आहे.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या मुंबईत असलेला जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याच्या भिंती तोडण्याची कारवाई लवकरच होऊ शकते. बंगल्याच्या बाजूचा असलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर असलेल्या भिंती तोडण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.  

प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर तीन वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई महानगरपालिकेने भिंती तोडण्याची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली.

प्रतिक्षा बंगलाच्या शेजारील इमारतींमधील लोकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसापासून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरचा रस्त्यावर रोड मॅपिंग तसेच मार्किंग करत आहेत. त्यामुळे येणारा काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

महागाईविरोधात छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन; आज ७४ व्या वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here