शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; परिचारिकेचे मानले आभार,म्हणाले…

uddhav-thackeray-fraction-on-sharad-pawar-resign-claims-split-in-ncp-news-update-today
uddhav-thackeray-fraction-on-sharad-pawar-resign-claims-split-in-ncp-news-update-today

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Ncp President खासदार शरद पवार Sharad-Pawar यांनी आज बुधवार (7 मार्च) कोरोना लसीचा दुसरा डोस Second-dose-of-covid-19-vaccine घेतला आहे. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते घरी विश्रांती घेत आहेत. शरद पवारांनी निवासस्थानीच कोरोनाचा दुसरा डोस घेतला.

शरद पवारांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!”.

शरद पवारांनी यावेळी लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन करोनाविरोधातील लढाईत सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. “योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: …त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता!

यावेळी सुप्रिया सुळे, डॉक्टर लहाने उपस्थित होते. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली आहे. याआधी शऱद पवारांनी १ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन त्यांनी कोरोनाची लस घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here