“सुशांत सिंह बद्दलची भावना भाजपा नेत्यांना अन्वय नाईक यांच्याबद्दल का वाटत नाही?”

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांचा भाजपावर हल्लाबोल

bjp-only-benefits-from-popular-front-of-india-sachin-sawants-statement-news-update-today
bjp-only-benefits-from-popular-front-of-india-sachin-sawants-statement-news-update-today

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. भाजपाने अर्णब गोस्वामी यांची बाजू घेतली असून महाविकास आघाडी सरकारविरोधात टीका सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत Sachin sawant यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या व आमदार राम कदम यांच्यावर टीका केली आहे. ”सुशांत सिंहबद्दलची भावना भाजपा नेत्यांना दिवंगत अन्वय नाईक यांच्या बद्दल का वाटत नाही? मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या भाजपा नेते इतके विरोधात का? महाराष्ट्रातील मायलेकींना न्याय मिळाला याचे किरीट सोमय्या, राम कदम यांना दुःख झाले. महाराष्ट्राची १३ कोटी जनता माफ करणार नाही.” असं सचिन सावंत Sachin sawant यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली जात असल्याचा भाजपाकडून आरोप करण्यात आलेला आहे. ठाकरे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला होता. तर, आमदार राम कदम हे देखील अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालय परिसरात उपोषणास बसले होते. शिवाय, घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्तानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत ते पदयात्रा करणार आहेत. अर्णब यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा l भारतातही फुट पाडणाऱ्या शक्तींचा पराभव करावा लागेल l दिग्विजय सिंह

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या (सोमवार 9 नोव्हेंबर) निर्णय देणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता उद्या होणार आहे. जर उद्याही त्यांना जामीन मिळाला नाही तर अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं आहेत.

 
 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here