Sachin Vaze l सचिन वाझेंचे पोलीस खात्यातून निलंबन

mansukh-hirens-murder-was-instigated-sachin-waze-nia-mentions-accused-number-one-in-chargesheet
mansukh-hirens-murder-was-instigated-sachin-waze-nia-mentions-accused-number-one-in-chargesheet

मुंबई : पोलीस निरीक्षक सचिन वाझे Sachin Vaze यांना अखेर पोलीस खात्यातून निलंबित Suspended-from-police-department करण्यात आले आहे. एनआयएच्या अटकेनंतर सोमवारी वाझेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अँटिलिया प्रकरणी वाझेंची याआधीच एनआयए NIA कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई

एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर वाझेंवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर सोमवारी त्यांच्यावर पोलीस खात्यातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाझेंवरील निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे. 2 डिसेंबर 2002मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी सचिन वझेंना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 6 जून 2020ला पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते.

सचिन वाझे 25 मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत

सचिन वाझेंना अटक केल्यानंतर त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं ही कोठडी ठोठावली आहे. NIA ने परिस्थितीजन्य पुरावे कोर्टात सादर केले. NIA ने म्हटलं, की “वाझे यांची चौकशी करण्यासाठी कोठडी गरजेची आहे, कारण या प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर आहे. यात चेन ब्रेक करायची आहे. हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. यात इतर लोकं सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे.”

सचिन वाझेंच्या वकिलांचा युक्तिवाद

वाझे यांच्या वकिलांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडताना त्यांच्याविरोधात कसलाही पुरावा नसल्याचा दावा केला. “एनआयएने फक्त संशयाच्या आधारावर त्यांना अटक केली आहे, त्यांच्या रिमांडमध्ये आरोपी विरोधात काही पुरावा नाही” असा युक्तिवाद वाझेंच्या वकिलांनी कोर्टात केला.

13 तास चौकशीनंतर एनआयएकडून अटक

एनआयएने शनिवारी 13 मार्च रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझेंना अटक केली. त्यापूर्वी जवळपास 13 तास त्यांची NIA ने चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या.

या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here