मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदल्यानंतर संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले…

“मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांच नाव दिलं आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावं बदलणं आणि त्यातून काय मिळवायचं आहे हे सरकारला माहिती आहे.

Shiv-sena-mp-sanjay-raut-reaction-after-modi-government-changed-the-name-of-rajiv-gandhi-khel-ratna-award
Shiv-sena-mp-sanjay-raut-reaction-after-modi-government-changed-the-name-of-rajiv-gandhi-khel-ratna-award

मुंबई l राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं Rajiv Gandhi khel Ratna Award  नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM Narendra Modi ट्विट करत ही माहिती दिली आहे. मेजर ध्यानचंद Major Dhyanchand यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार Shiv-Sena MP संजय राऊत Sanjay Raut यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

“मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांच नाव दिलं आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावं बदलणं आणि त्यातून काय मिळवायचं आहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी होऊ नये,” असं संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं आहे.

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधानांच नाव देण्यात आलं आहे असे विचारले असता, “ही त्यांची भूमिका आहे. भाजपाने ठरवलं असेल एखाद्याचं नाव द्यावं किंवा बदलावं त्यांचं सरकार आहे, बहुमतातलं सरकार आहे,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

“आपल्याला जी पदकं मिळतायत ते काय एखाद्या राजकीय पक्षाचं यश नाही. हे निवडणुकांचं यश नाही. हे त्या खेळाडूने, त्या त्या राज्याने केलेली मेहनत आहे. अनेक वर्षापासून त्यांच्यामागे यंत्रणा काम करते. त्या सर्वांच्या मेहनतीमधून ती पदकं आपल्याला मिळतायतं,” असे राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा

केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल !; नाना पटोलेंचा आरोप

राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का?; भाजपचा सवाल 

भाजपा नेते कृष्णकुंजवर;चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांच्यात गुफ्तगू!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here