नाना पटोलेंचा भाजपावर गंभीर आरोप, अनिल देशमुखांवर बोलताना म्हणाले…

Nana Patol demanded Former Chief Minister Ashok Chavan and Investigate the Sanjay Raut case and bring the guilty to justice
Nana Patol demanded Former Chief Minister Ashok Chavan and Investigate the Sanjay Raut case and bring the guilty to justice

पुणे: निवडणुकीच्या अगोदर मला भाजपात घ्या, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आम्हाला किती वेळा म्हणाले होते, असे त्यांना विचारा असे विधान भाजपाचे निते गिरीश महाजन यांनी केले आहे. महाजन यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळाच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या याच विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समाचार घेतला आहे. भाजपाच्या कोणत्याही मंत्र्याच्या कोणत्याही विधानाला अर्थ उरलेला नाही. जनतेला दिलेले एकही आश्वासन भाजपा पक्ष पूर्ण करू शकलेला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ते आज (१३ फेब्रुवारी) पुण्यात महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

 “भाजपाने जनतेला अनेक आश्वासनं दिली. महागाई कमी करू असे सांगितले होते. मात्र महागाई वाढली. दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असे सांगितले होते. मात्र आता बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ, असे सांगितले होते. मात्र हा हमीभाव देण्यात आलेला नाही. कोण येणार, कोण जाणार होतं? तसेच खोक्याचे राजाकारण सर्वांनाच पाठ झालेले आहे. भाजपाच्या या थोतांडाला लोक कंटाळले आहेत,” असे नाना पटोले म्हणाले.

 “त्यांनी परमबीर सिंह यांना त्यांनी कोठे लपवले. परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये कोठून आणले? असे प्रश्न आम्ही त्यांना या अधिवेशनातही विचारणार आहोत. परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपालाच मिळालेले होते. अनिल देशमुख यांच्यासारख्या निरापराध माणसाला दीड ते दोन वर्षे मुद्दामहून तुरुंगात टाकले. त्यांचे राजकीय, सामाजिक आयुष्य संपवले. याचा हिशोब भाजपाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपाने कोणत्याही मंत्र्याने केलेल्या वक्तव्याला कोणताही अर्थ राहिलेला नाही,” असे नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here