Coolie no. 1 trailer l ‘कुली नं. १’ गोविंदा की वरुण?पाहा ट्रेलर

२५ डिसेंबर रोजी ‘कुली नंबर १’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

varun-dhawan-and-sara-ali-khan-coolie-no-1-trailer-released
varun-dhawan-and-sara-ali-khan-coolie-no-1-trailer-released

गोविंदाच्या Govinda ‘कुली नंबर १’ Coolie no.1 या चित्रपटाने नव्वदच्या दशकात बॉक्स ऑफिसवर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनने David Dhawan त्याचा रिमेक करण्यात निर्णय घेतला होता. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन Varun Dhawan आणि अभिनेत्री सारा अली खान Sara ali khan मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘कुली नंबर १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ३ मिनिटं १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि साराची केमिस्ट्री पाहायला मिळते. दरम्यान चित्रपटात साराच्या वडिलांची भूमिका परेश रावल यांनी साकारली असल्याचे दिसत आहे.

परेश रावल हे त्यांच्या मुलीसाठी (सारासाठी) अतिशय श्रीमंत मुलगा शोधत असतात. तेव्हा त्यांची भेट वरुण धवनशी होते. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

वरुणने चित्रपटाचे एक पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहता तो चित्रपटात पाच वेगवेगळे रोल करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे.

वाचा l फणस खाण्याचे शारीरिक फायदे माहीत आहेत का?

या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

वाचा l Covishield vaccine l PM मोदींच्या सीरम भेटीनंतर अदर पुनावालांनी दिली ‘ही’ माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here