बळीराजा संकटात असताना महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही, मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लीम वादातच सरकारला स्वारस्य: अतुल लोंढे

Not a single minister from the Mahayuti government visited the farmers' fields when the farming community was in distress; the government is interested only in Maratha-OBC and Hindu-Muslim conflicts: Atul Londhe
Not a single minister from the Mahayuti government visited the farmers' fields when the farming community was in distress; the government is interested only in Maratha-OBC and Hindu-Muslim conflicts: Atul Londhe

मुंबई:राज्यात यावर्षी सरासरी २५ टक्के पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहेशेतातील उभी पिकं करपून गेली आहेत. शेतकरी मोठ्या संकटात असून आत्महत्या वाढतायेत. राज्य सरकारने कर्जमाफी केलीत्याचा फायदा झालेला नाही. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्याला बसत आहेत पण महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही. शेतकरी संकटात असून मदतीचे कायअसा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

दुष्काळावर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले कीसोयाबीनकापसाचे उत्पन्न या वर्षी पावसाअभावी कमालीचे कमी होण्याचे चित्र आहे. तुरमूगउडीद यासह डाळींबकेळीपेरू अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे. विदर्भ मराठवाड्यासह अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने रब्बी पिके येण्याची शक्यता नाही. नगरपालिका क्षेत्रात तीन चार दिवसातून एकदा पाणी येत आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सणासुदीचे दिवस आहेत पण बळीराजा मात्र चिंतेत आहेमुलांचे शैक्षणिक शुल्कपरीक्षा शुल्क कसे भरायचे ही चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. राज्य सरकारच्या योजना फक्त कागदावरच दिसत असून कर्जमाफी व मदतीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे.

महागाईबेरोजगारीकायदा सुव्यवस्थाशेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना राज्यातील भाजपा महायुती सरकार मात्र मराठा-ओबीसीहिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी घालून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. भाजपाचे राज्यातील सरकार जनतेच्या मुळ प्रश्नावर बोलत नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे समान नागरी कायद्यावर बोलत आहेतशेतकऱ्यांच्यासर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर हे सरकार बोलतच नाही असेही अतुल लोंढे म्हणाले.

ओबीसी समाजाला खुल्या प्रवर्गात टाकण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा डाव : नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here